लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि. 5 जून) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खांदा कॉलनी सेक्टर 13 येथील पाण्याच्या टाकीसमोर उपमहापौरांच्या कार्यालयात या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन उपमहापौर सीताताई पाटील व एसएनआय हॉस्पिटल यांच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहापौर सीताताई पाटील, भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी, ओम साई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या वेळी सीताताई पाटील यांच्या नगरसेवक निधीतून खांदा कॉलनीतील रहिवासी सोसायट्यांना डस्टबीन व बेंचचे वाटपही करण्यात येणार आहे.