आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
वाढत्या शहरीकरणात होणार्या प्रदूषणावर उपाय म्हणून वृक्षारोपण करणे अतिशय गरजेचे आहे. याच उद्देशाने पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 31) पनवेल येथील लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे आणि पदाधिकार्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांचे कौतुक करून पर्यावरण संवर्धनासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने होत राहावे, असे मत व्यक्त केले.
आयुक्त मंगेश चितळे म्हणाले की, पनवेल महापालिका हद्दीत सव्वा लाख वृक्ष लागवड करण्याचे ध्येय आम्ही ठेवले असून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. खारघरची टेकडीदेखील हिरवीगार करणार असल्याचे सांगून त्यांनी प्रेस क्लबच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व कळावे याकरिता एक झाड आईच्या नावे असा उपक्रम शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने हे वृक्षारोपण शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आले असल्याचे पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष भाई ओव्हाळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र मोरे, पनवेल तालुका प्रेस क्लब सचिव दत्तात्रय कुलकर्णी, सहसचिव स्वप्नील दुधारे, खजिनदार राकेश पितळे, सल्लागार गणेश कोळी, संजय कदम, सुमंत नलावडे, सदस्य राजेंद्र पाटील, वर्षा कुलकर्णी, प्रतिक वेदपाठक, लालचंद यादव, गणेश घोलप आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper