पेण ः प्रतिनिधी
महाड येथील प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची पेणच्या प्रांताधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर पेणच्या विद्यमान प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांची महाड येथे बदली झाली असून, त्या महाडच्या प्रांताधिकारी म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
मूळचे सांगली येथील विठ्ठल इनामदार यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे यापूर्वी काम केले आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी व महाड येथे त्यांनी प्रांताधिकारी म्हणून आपले कर्तव्य चोख बजावले आहे. मागील 12 वर्षांपासून ते महसूल विभागात कार्यरत असून या काळात त्यांनी गोरगरीब जनतेची अनेक कामे केली आहेत. कोरोनाच्या संकटात एकही सुटी न घेता रात्री उशिरापर्यंत कार्यालयीन वेळेव्यतिरिक्तही प्रतिमा पुदलवाड यांनी कर्तव्यदक्ष राहून चोख कामगिरी बजावली. पेण येथे प्रांताधिकारी म्हणून कार्य करताना पुदलवाड यांनी हजारो गोरगरीब नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत. तसेच अनेक मोर्चे-आंदोलनांना सामोरे जात सामंजस्याच्या भूमिकेतून समस्या सोडविण्याचे काम केले आहे.