पनवेल : रामप्रहर वृत्त
बहुजन समाजासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा आणली, त्यांच्या शिकवणीतून समाज समृद्ध झाला, त्यामुळे कर्मवीर अण्णांची शिकवण घेऊन कर्तृत्वाने मोठे व्हा, असा मोलाचा सल्ला रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांची 137वी जयंत्ती दापोली येथील अनंत पांडुरंग भोईर विद्यालय आणि रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात झाली. या वेळी ते बोलत होते.
दापोली येथील अनंत पांडुरंग भोईर विद्यालय आणि रघुनाथशेठ जितेकर ज्युनियर कॉलेज येथे केले तसेच आगामी काळातही विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी दिली.
जयंत्तीच्या कार्यक्रमानिमित्त इयत्ता पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शशिकला पाटील यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी नवीन इमारत बांधकामासाठी 10 हजार रुपयांची देणगी दिली तर मुंबईकर कविता विनायक यांनी आपल्या आईवडिलांच्या पुण्य स्मरणार्थ एक लाख रुपयांची देणगी दिली.
या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, उद्योजक जे.एम.म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, एच.एन. पाटील, काशिनाथ पाटील, राम हरी म्हात्रे, विद्यालयाचे चेअरमन प्रकाश जितेकर, अशोक डाऊर, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी एम.के. कोंगेरे, सहाय्यक विभागीय अधिकारी यु व्ही. जगताप, प्रकाश कडू, मिलिंद कांदळगावकर, घाग सर, संजीवनी म्हात्रे, नाईक मॅडम, अमित भोईर, एच. एन. पाटील, शशिकला पाटील, वकील विजया राजाराम म्हात्रे, दापोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच राम गोसावी, मुख्याध्यापिका पुष्प लता ठाकूर, पर्यवेक्षिका वेळेकर मॅडम, उपमुख्याध्यापक भरणुके सर, स्नेहल पाटील, सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी
उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …