Breaking News

कोरोनामुळे गोविंदांच्या उत्साहावर पाणी

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोना महामारीमुळे यंदा गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सव पूर्णपणे शांततेत पार पडला. शहरात यंदा मोठ्या हंडी बांधल्याच नसल्याने गोविंदांच्या उत्साहावर पाणी पडले. शहरात मंगळवारी रात्री 12 वाजता राधाकृष्ण मंदिर तसेच कानिफनाथ मठात श्रीकृष्ण जन्मसोहळाही काही निवडक भक्तांच्या उपस्थितीत उरकण्यात आला. प्रत्येक आळीतून निघणार्‍या गोविंदांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बंदी घालण्यात आली होती. दरवर्षी पाच थरांची खासगी हंडी फक्त चार फुटांवर बांधण्यात आल्याने बालगोपाळांनी ती फोडण्याचा आनंद लुटला.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply