Breaking News

महायुती ‘मातोश्री’वर पाठविणार पाच लाख पत्रे ; दूध दरवाढ आंदोलन

नाशिक : प्रतिनिधी

दुधाची दरवाढ न केल्याच्या निषेधार्थ घरात अथवा गोठ्यांमध्ये बसून सरकारचा निषेध करायचा, अशी आंदोलनाची हाक मंगळवारी (दि. 11) महायुतीतर्फे देण्यात आली. त्याचप्रमाणे 13 ते 18 ऑगस्ट या कालावधीत दूध उत्पादकांच्या मागण्यांसंबंधी पाच लाख पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पाठविण्यात येणार आहेत. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दूध उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीतर्फे दोनदा आंदोलन करण्यात आले, पण राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या गंभीर परिस्थितीची पर्वा न करता त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले, मात्र महायुतीतील घटक पक्ष शांत बसणार नाहीत. शेतकरी बांधवांना असे वार्‍यावर सोडणार नाही. जोपर्यंत त्यांना अनुदान मिळत नाही, तोपर्यंत लढण्यासाठी दूध आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय  महायुतीच्या बैठकीत घेण्यात आला, असे खोत यांनी सांगितले. ऑनलाइन बैठकीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अविनाश महातेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply