Breaking News

‘पालिका प्रशासनाने गरजवंतांसाठी संक्रमण शिबिरे उभारली नाहीत’

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महापालिकेकडे कोट्यवधींच्या ठेवी आहेत. सध्या गोष्टींसाठी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र आजमितीस पालिकेला शहरात सिडकोच्या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर उभारण्यात आले नाही ही बाब शोचनीय आहे. आयुक्तांनी सिडकोसोबत बैठक घेऊन अटींमध्ये शिथिलता दिल्यास रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावावेत  अशी मागणी बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली.

धोकादायक  इमारतींमधील नागरिकांसाठी संक्रमण शिबीर उभारावे तसेच शहरातील कोविडसह अनेक प्रश्नांबाबत आ. म्हात्रे यांनी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली त्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

मुंबईत दोन इमारती कोसळून सात जण ठार झाले आहेत. नवी मुंबईत देखील हीच परिस्थिती वाशीतील जेएन टाईपच्या इमारतींची आहे. गेली अनेकवर्षं या इमारती अतिधोकादायक म्हणून ठरवल्या गेल्या आहेत. मात्र त्याव्यतिरिक्त पालिकेची गाडी पुढे सरकलेली नाही. पालिका स्वच्छ अभियानाचे पुरस्कार मिळवते व पाठ थोपटून घेते मात्र इतर सुविधांबाबत मात्र नागरिकांना झगडावे लागत आहे. आयुक्त बांगर यांनीही याबाबत सकारात्मकता दाखवली असून पोलिसांची व सिडको अधिकार्‍यांसोबत बैठक तातडीने घेतली जाईल असे आश्वासन आल्याचे आमदार म्हात्रे म्हणाल्या. तसेच पामबीच येथे काही अनधिकृत इमारती असून त्यावर करवाई करण्यात येणार आहे. अशा इमारतींमध्ये पालिकेने वीज व पाणी देऊन त्यात रहिवाशांना स्थलांतरित करावे असे देखील आयुक्तांना सुचवल्याचे आमदार म्हात्रे म्हणाल्या. कोणाला क्रेडिट घ्यायचे साहे संक्रमण शिबिरांचे ते त्यांनी घ्यावे, मात्र  वाशीतील व नवी मुंबईतील अनेक धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना न्याय द्यावा.

या वेळी भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत म्हणाले की, कोरोनापेक्षा पालिकेच्या व्यवस्थेला नागरिक घाबरले आहेत. नागरिकांनी पालिकेच्या डॉक्टर्स किंवा अधिकार्‍यांना फोन केल्यावर त्यांनी नागरिकांना सकारात्मक पद्धतीने नम्रतेने उत्तरे देण्यात यावीत. तर नागरिकांमधील संभ्रम दूर होईल. 

भाजपचे महामंत्री विजय घाटे म्हणाले की, केंद्र शासनाच्या पॉलिसीनुसार कंटेंन्मेंट क्लस्टर ही एक पद्धत आहे. रुग्ण वाढत असल्यास त्या विभागातील 50 घरांची तपासणी केली जाते. याबाबत आयुक्तांना सुचवले आहे. यासोबत पालिकेच्या शालेय मुलांना पुस्तके देण्यास उशीर झाला असून ती पुस्तके द्यावीत अथवा पैसे देण्यास सुरू करावे. जेणेकरून मुलांमध्ये उत्साह निर्माण होईल. याबाबत आयुक्त सकारात्मक असल्याचे घाटे म्हणाले.

  • सिडकोचेदेखील दुर्लक्ष

आजतागायत शहरावर राज्य गाजवणार्‍या सिडकोने देखील ता बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. सिडकोने स्वतः नवी मुंबईत संक्रमण शिबिरे उभारणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पालिकेवरच सर्व काही सोडून सिडको नैनाकडे नव्याने वळली आहे. त्यामुळे पालिकेसोबत सिडकोदेखील वाशीतील रहिवाशांच्या परिस्थितीबाबत तितकीच जबाबदार असल्याचे दिसून येते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply