Breaking News

पनवेलच्या कोविड-19 रुग्णालयांतील बेड्सची माहिती आता एका क्लिकवर! भाजपच्या मागणीनुसार नागरिकांसाठी महापालिकेची लिंक

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात धावपळ होऊ नये याकरिता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कोविड-19 रुग्णालयांमधील दररोजच्या उपलब्ध बेड्सबाबतची माहिती नागरिकांना लिंकद्वारे मिळणार आहे. पनवेलकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने तसेच महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी यांच्या मागणीनुसार या लिंकची कार्यवाही प्रशासनाने केली आहे.

या संदर्भात महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. पनवेल महापालिका व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी ज्या हॉस्पिटलची निवड आपण केलेली आहे तेथे उपचाराच्या सुविधा कितपत आहेत हे नागरिकांना व रुग्णांना समजण्याचे कोणतेही माध्यम उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असून, सर्वत्र गोंधळ पसरलेला आहे. यासंबंधीची माहिती रोजच्या रोज डॅशबोर्डवर प्रसिद्ध केल्यास नागरिकांना कोविड केअर सेंटरची उपलब्धता व क्षमता कळेल तसेच रुग्णांना विनाकारण हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती.  

या मागणीनुसार हीींिीं://ुुु.र्लेींळवलशवरिर्पींशश्र.ळप संकेतस्थळावर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कोविड-19 रुग्णालयांबाबतची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. याद्वारे नागरिकांना रुग्णालयांची नावे व संपर्क क्रमांक तसेच संबंधित रुग्णालयातील एकूण बेड्स, अतिदक्षता विभाग (आयसीयू) व साधारण विभागात उपलब्ध असलेले बेड्स यांची दररोजची तपशीलवार माहिती दिली जात आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply