पनवेल : वार्ताहर
आजच्या काळामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची असून ते 24 तास कर्तव्य बजाविण्यासाठी रस्त्यावर असतात. या वेळी त्यांना अनेकांशी संपर्क येतो. यातून कोरोनासारख्या विषाणूंचा प्रादूर्भाव त्यांना होऊ नये म्हणून रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने क्राईम ब्रँच युनिट-2 पनवेलच्या पथकाला मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. क्राईम ब्रँच युनिट-2, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपेरे यांच्या कार्यालयातील प्रांगणात रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे अध्यक्ष भरत शिंदे, नाना कांडपिळे, रावसाहेब जाधव, अक्षय कांडपिळे, अॅड. मितेश पाटील आदींनी या वेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचार्यांना मास्कसह सॅनिटायझरचे वाटप केले. लोकांच्या आरोग्याची जशी काळजी घेता तशीच काळजी स्वतःची व कुटुंबियांची घ्यावी, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी केले आहे.