Breaking News

शेलार हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात भाजप आक्रमक

Healthcare and medical concept. Medicine doctor with stethoscope in hand and Patients come to the hospital background.

पनवेल : वार्ताहर

खांदा कॉलनी सेक्टर 1 येथील शेलार हॉस्पिटलकडून होत असलेल्या रुग्णांच्या आर्थिक पिळवणुकीविरोधात पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ब सभापती व नगरसेवक संजय भोपी, माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीता पाटील आणि नगरसेविका कुसुम गणेश पाटील तसेच खांदा कॉलनी मधील सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्येकर्ते यांची उग्र जनआंदोलनाची भूमिका घेतली आहे.

खांदा कॉलनीमधील शेलार हॉस्पिटल हे सुरूवातीपासूनच रुग्णसेवेच्या नावाखाली सातत्याने स्वतःचा खिसा भरत आहेत. सध्याच्या कोरोना काळातदेखील या हॉस्पिटलने निर्लज्जपणे लूटमार चालूच ठेवली आहे. या हॉस्पिटलच्या अंदाधुंद व मनमानी तसेच हेकेखोरपणाच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींना येत आहेत. हॉस्पिटलमधील रिकामे बेड भरण्यासाठी रुग्णांना अनाठायी भीती दाखवून भरती करत अवाजवी दर आकारून आर्थिक पिळवणूक करताना यांना थोडीही लाज वाटत नाही. योग्य तपासणी न करता कमिशन मिळत असलेल्या चाचण्या करत आठ दहा दिवस थातुरमातुर उपचार केले जातात. एखादा कोरोना बाधित रुग्ण असल्यास योग्य वेळी चाचणी न झाल्यामुळे त्याचा वेळ वाया जाऊन आजार गंभीर होऊन हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळे त्यास अतिदक्षता विभागात भरती व्हावे लागते प्रसंगी जीवितास धोका निर्माण होत आहे. तसेच रुग्णांकडून पैसे घेण्यासाठी धाक – दडपशाहीचा मार्ग अवलंबला जात आहे.

शेलार हॉस्पिटलच्या या जाचक मनमानी कारभाराविरोधात कारवाईची मागणी मा. आयुक्त साहेब तसेच संबंधित सर्व शासकीय यंत्रणा यांना करण्यात आली आहे.  शेलार हॉस्पिटलविरोधात जर काही तक्रार असेल तर खांदा कॉलनीमधील नगरसेवक यांना संपर्क साधावा ही विनंती.

शेलार हॉस्पीटलचा माज उतरवण्यासाठी माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक मनोहर म्हात्रे,  नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेवक सीता पाटील, नगरसेवक कुसुम पाटील व नगरसेवक संजय भोपी यांच्या वतीने पुढाकार घेऊन भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी यांच्या वतीने उग्र जनआंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी या हॉस्पिटलची असेल याची शेलार हॉस्पिटल प्रशासनाने नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

कोरोना काळात या हॉस्पिटलमध्ये खुप सार्‍या रुग्णांना आपले जीव गमवावे लागले आहे आणि ते निर्दयी डॉक्टर बिनधास्तपणे आपल्या बिलाची रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांकडून उकळत आहेत तरी या होणार्‍या अन्यायकारक लुटमारीला कुठे तरी लगाम बसलाच पाहिजे.

-संजय भोपी, सभापती, प्रभाग समिती ब, पमपा

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply