
पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनची खेळाडू स्वस्तिका घोषने टेबल टेनिस खेळाच्या जागतिक क्रमवारीत 19 वर्षीय मुलींच्या गटात चौैथ्या स्थानी झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारी स्वस्तिका ही भारतातील पहिली टेबल टेनिस खेळाडू ठरली आहे. याबद्दल तिचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले. या वेळी स्वस्तिकाचे पालक व प्रशिक्षक संदीप घोष उपस्थित होते.