Breaking News

खारघरमध्ये बंदी झुगारून पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी

खारघर : प्रतिनिधी

खारघर मधील पर्यटन क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करून पर्यटन स्थळी प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले  असूनही काही पर्यटक आदेश पायदळी तुडवूत धबधब्याचा   खारघर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर आनंद घेत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे.

खारघर मधील पांडवकडा धबधबा, सेक्टर पाच खारघर टेकडी, फणसवाडी, चाफेवाडी, ओवे, तळोजा जेल समोरील तलाव आणि सेक्टर सहा ड्रायव्हिंग रेंज लगत असलेल्या टेकडीवरून पावसाळयात कोसळणार्‍या पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या वर्षी शासनांने कोरोनाचा प्रादुभाव रोखण्यासाठी पर्यटन स्थळावर बंदी घातली आहे. पावसाळ्यात खारघर परिसरातील धबधबा आणि तलावात आनंद घेताना पर्यटक पडून जखमी होण्याचे आणि बुडून मरण पावल्याची घटना घडल्या असल्यामुळे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार या पर्यटन क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून, विना परवाना प्रवेश केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे फलक पर्यटस्थळी लावले आहेत. तरीसुध्दा काही पर्यटक खारघर सेक्टर पाच मधील हेदोरे आदिवासी वाडी लगत असलेल्या डोंगराच्या धबधब्यावर पर्यटक आदेशाचे उल्लंघन करीत पावसाचा आनंद घेत असल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. यामध्ये महाविद्यालय तरुण, तरुणी आदींचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply