चेन्नई : वृत्तसंस्था
संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करीत आज संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी मी निवृत्त झालोय असे समजावे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या या वेळेमागचे गणित उलगडवून दाखवले आहे.
विश्वनाथन म्हणाले, दक्षिणेकडील राज्यांत 7 वाजून 29 मिनिटांची वेळ ही सूर्यास्ताची मानली जाते. माझ्या मते याच कारणासाठी त्याने ही वेळ निवडली.
दरम्यान, धोनी सध्या आयपीएलची तयारी करीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरीही धोनी आयपीएल खेळणार आहे.
Check Also
खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …