पनवेल : वार्ताहर
पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 28) आरक्षण जाहीर झाले आहे. पनवेल पंचायत समितीच्या 18 जागांपैकी नऊ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 4 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी दोन जागा, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी दोन जागा तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी एक जागा आरक्षित झाली आहे. याशिवाय सर्वसाधारण जागेसाठी सहा जागा, तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दोन जागा राखीव, अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित झाली आहे.
पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. त्यानुसार पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेले आरक्षणाप्रमाणे सर्वसाधारण (स्त्री)-वांवजे, आदई, पालीदेवद, कोळखे; नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)- नेरे, गव्हाण; अनुसूचित जमाती (स्त्री)-पाले बुद्रुक, पोयंजे; अनुसूचित जाती (स्त्री)-विचूंबे; सर्वसाधारण-दुंदरे, वावेघर, पळस्पे, वडघर, केळवणे, आपटा; नागरिकांचा मागास प्रवर्ग-ओवळे, वहाळ; अनुसूचित जमाती-शिरढोण असे केले आहे.
उरणमध्ये दहा गणांचे आरक्षण जाहीर
उरण : प्रतिनिधी
उरण पंचायत समितीच्या 10 गणांचे आरक्षण गुरुवारी (दि. 28) सोडत पद्धतीने काढून जाहीर करण्यात आले. उरण पंचायत समितीच्या 10 जागा आहेत. या दहाही गणांची सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले.
उरण गटविकास कार्यालयातील सभागृहात उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या उपस्थितीत आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, गटविकास कार्यालयातील अधिकारी आदी उपस्थित होते.
गण क्रमांक 57 जसखार- ना.मा.प्र. (महिला), गण क्रमांक 58 जासई- सर्वसाधारण (महिला), गण क्रमांक 59 विंधणे- सर्वसाधारण (महिला), गण क्रमांक 60 चिरनेर- सर्वसाधारण, गण क्रमांक 61 नवघर-ना.मा.प्र., गण क्रमांक 62 म्हातवली- अनु.जमाती (महिला), गण क्रमांक 63 केगाव- सर्वसाधारण, गण क्रमांक 64 चाणजे- सर्वसाधारण (महिला), गण क्रमांक 65 बांधपाडा- सर्वसाधारण, गण क्रमांक 66 आवरे- सर्वसाधारण, असे सोडत पद्धतीने काढण्यात आलेले आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
उरण पंचायत समितीमध्ये याआधी आठ गण होते. त्यामध्ये यावर्षी येत्या निवडणुकीसाठी दोन गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे पंचायत समितीची सदस्य संख्या 10वर पोहचली आहे.