Breaking News

पनवेल तालुक्यात 92 नवीन रुग्ण

सात जणांचा मृत्यू; 210 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 17) कोरोनाचे 92 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 72 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 177 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 20 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 33 रुग्ण बरे झाले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल दोन, कामोठ दोन, पनवेल, कळंबोली येथे प्रत्येकी एक अशा सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत पनवेल 15, न्यू पनवेल 9, खांदा कॉलनी 6, कळंबोली 9, कामोठे 22, खारघर 11 असे नवीन रुग्ण आढळले आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 9255 रुग्ण झाले असून 7636 रुग्ण बरे झाले आहेत. 1381 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 238 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये करंजाडे पाच, उलवे चार, बोर्ले, चिपळे, गुळसुंदे, हरिग्राम, केवाळे, कोपर-गव्हाण, मोर्बे, शिरढोण, सुकापूर, तुरमाळे, उसर्ली खुर्द येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर करंजाडे येथील एका व्यक्तीचा मृत्यूचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत पॉझिटिव्हची संख्या 2796 झाली असून 2328 जणांनी कोरोनावर मात केली असून 59 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात दोन नवे रुग्ण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात रविवारी (दि.16) कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण आढळले, एक रुग्णाचा मृत्यू व 13 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये करंजा नवापाडा, मोरा साईबाबा मंदिर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी तीन, उरण तीन, फुंडे दोन, बोकडवीरा दोन, कोप्रोली, जासई, करंजा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर मोरा साईबाबा मंदिर येथे एकाचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1165 झाली आहे. त्यातील 920 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 194 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कर्जतमध्ये 12 जणांना लागण

कर्जत : कर्जत तालुक्यात सोमवारी 12 नवीन कोरोना बाधित आढळले असून त्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. आजपर्यंत कर्जत तालुक्यात 678 रुग्ण सापडले असून त्यापैकी 564 रुग्ण बरे झाले आहेत. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 34 वर गेली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये कॉलेज रोड नजीक राहणार्‍या एक कुटुंबातील चार जण, दहिवली दोन, नेरळ दोन, वांजळे, नेरळ, दहिवली, कर्जत येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

रोहा तालुक्यात 29 जणांना संसर्ग

रोहे : रोहा तालुक्यात सोमवारी 29 कोरोना बाधित व्यक्ती आढळल्या असून 33 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रोहा तालुक्याची कोरोना रुग्णसंख्या 975 वर पोहोचली आहे. कोरोना वर मात करणार्‍या व्यक्तींची संख्या 714 वर पोहोचली आहे. आतापर्यंत रोहा तालुक्यात 26 व्यक्तींना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. रोहा तालुक्यात आत्ता 235 कोरोना सक्रिय बाधित व्यक्ती असून ते विविध ठिकाणी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरात 13 तर ग्रामीण भागामध्ये 16 व्यक्ती सापडल्या आहेत. यामध्ये 14 स्त्रियांचा व 15 पुरुषांचा समावेश आहे. सोमवारी आढळलेल्या व्यक्तींमध्ये 60 वर्षावरील सहा व्यक्ती कोरोनामुळे बाधित झाले असून तर बाधितांमध्ये 15 वर्षाखालील तीन मुलांचा समावेश आहे.

नवी मुंबईत 240 रुग्णांची नोंद

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत सोमवारी 240 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर 470 जण कोरोनामुक्त झाले. बाधितांची एकूण संख्या 21 हजार 140 तर बरे झालेल्यांची 17 हजार 126 झाली आहे. सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 511 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 33, नेरुळ 50 वाशी 21, तुर्भे 15, कोपरखैरणे 51, घणसोली 47, ऐरोली 27 अशी आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply