लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा मौलिक सल्ला
कामोठे : रामप्रहर वृत्त
यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि शालेय जीवनात यशस्वी होऊन आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा, असे प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी कामोठे येथे केले.
कामोठेमधील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात सोमवारी आलं होतं. या समारंभामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून, या वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थितांसमोर ते बोलत होते.
या वेळी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा भेट दिला, तसेच या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभाग पीआरओ बी. डी. कारंडे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक कामोठे स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनीता सोळंकी, प्रभारी मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे मॉनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.