Breaking News

आम्ही मोदीजींच्या सोबत!

खोपोलीत भाजपचे स्वाक्षरी मोहीम अभियान

खोपोली : प्रतिनिधी

पंजाब राज्याच्या दौर्‍यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांच्या सुरक्षेबाबत पंजाबमधील काँग्रेस सरकारने अक्षम्य दिरंगाई व बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केल्याचा आरोप करीत खोपोली भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (दि. 11) शहरातील दीपक चौकात आम्ही सर्व मोदीजींच्या सोबत हे स्वाक्षरी मोहीम अभियान राबविले.

भाजपचे खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, उपाध्यक्ष चंद्रप्पा आनीवार, सरचिटणीस हेमंत नांदे, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश रेटरेकर, सहचिटणीस गोपाळ बावस्कर, माजी शहराध्यक्ष ध्रुव मेहेंदळे, विजय तेंडुलकर, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, महिला मोर्चा चिटणीस सुनिता महर्षी, मीडिया सेलचे राहुल जाधव, संजय म्हात्रे, अनिल कर्णुक, मोरेश्वर दाते, अनिता शाह, सागर काटे, प्रसाद विध्वंस, विमल गुप्ते, प्रमिला दळवी, प्रदीप दळवी, विजय घोसाळकर, राकेश कुमार पाठक, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक या स्वाक्षरी मोहीम अभियानात सहभागी झाले होेत.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply