Breaking News

पनवेलमध्ये 263 नवे पॉझिटिव्ह

पाच जणांचा मृत्यू; 274 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 27) कोरोनाचे 263 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 274 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 192 रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला, तर 198 रुग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 71 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 76 रुग्ण बरे झाले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत कामोठे सेक्टर 34 मधील ऋषीकेश सोसायटी व नवीन पनवेल सेक्टर 18 येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 34 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1910 झाली आहे. कामोठ्यात 39 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2343 झाली आहे. खारघरमध्ये 35 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 2208 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 36 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2013 झाली आहे. पनवेलमध्ये 46 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1895 झाली. तळोजामध्ये दोन नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 594 आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 10,963 रुग्ण झाले असून 9656 रुग्ण बरे झाले आहेत. 1034 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 273 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 14, सुकापूर 11, मालेवाडी-सुकापूर सहा, करंजाडे पाच, देवद पाच, आदई चार, कोन, कुंडेवहाळ, नेरे, कोप्रोली, शिवकर येथे प्रत्येकी दोन, डेरवली, कोळखे, पारगाव, विचुंबे, भाताण, बोनशेत, दापोली, लाडीवली, नारपोली, पालेबुद्रुक, पालीदेवद, सावळे, शेलघर, शिरढोण, उसर्ली, वावंजे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3294 झाली असून 2801 जणांनी कोरोनावर मात केली, तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत 371 जणांना कोरोनाचा संसर्ग

नवी मुंबई : नवी मुंबईत गुरुवारी 339 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले तर 371 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे  नवी मुंबईतील कोरोना बधितांची एकूण संख्या 24 हजार 585 तर बरे झालेल्यांची 20 हजार 652 झाली आहे. गुरुवारी सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 564 झाली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 368 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 39, नेरुळ 77, वाशी 55, तुर्भे 47, कोपरखैरणे 58, घणसोली 46, ऐरोली 42, दिघा सात अशी आहे.

उरण तालुक्यात 14 नवे रुग्ण

उरण : तालुक्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह 14 रुग्ण आढळले, एक रुग्णाचा मृत्यू व 12 रुग्ण बरे झाले आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये महालक्ष्मी अपार्टमेंट तीन, चीर्ले दोन, सीआयएसएफ कॉलनी चारफाटा, उरण, धुतुम, एकदंत बिल्डींग कामठा, कोटनाका, डोंगरी, विंधणे, नवेपोपुड म्हातवली, पाणजे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर पाणजे येथीज एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1309 झाली आहे. त्यातील 1074 बरे झाले आहे. 172 रुग्ण उपचार घेत आहेत व 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाडमध्ये 16 जणांना लागण

महाड : मतालुक्यात गुरुवारी कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये महाड एमआयडीसी चार, नविपेठ दोन, एमबॉय कॉलनी, बिरवाडी, आकले, हाईटहाऊस, किये, ओमकार बिलं, काजळपूरा, खारखंड मोहल्ला, शुभलाभ बि.संतोषनगर बिरवाडी, गुरुदत्त अपार्टमेंट प्रभात कॉलनी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. महाडमधील कुंबळे अप्परतुडील आणि किंजळोली येथील दोघांचा  मृत्यू झाला आहे.

कर्जतमध्ये 10 नवे कोरोनाबाधित

कर्जत : तालुक्यात गुरुवारी एका पोलीस शिपायासह 10 नवीन कोरोना बाधित आढळले आहे. तालुक्यात एकूण 801 कोरोना रुग्ण आढळले असून 677 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  आढळलेल्या रुग्णांमध्ये वारे गावात दोन तसेच नेरळ पोलीस ठाणे, कर्जत शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या नजीकची इमारत, जैन मंदिरा जवळ,  बीड, दहिवली, गुरूनगर, कर्जत शहर,  भिवपुरी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply