पनवेल ः बातमीदार मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून शेतात पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने पनवेल तालुक्यातील शेतकर्यांनी लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढावल होते, मात्र मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आणि शेतात भरपूर प्रमाणात पाणी झाले. त्यामुळे पनवेल तालुक्यातील शेतकर्यांनी आपल्या कुटुंबासह शेती लावणीला सुरुवात केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळात कामधंदे बंद असल्याने शेतकर्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही तरुणांनी शेतीची कास धरली आहे. 3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटात सर्वच व्यवहार कोलमडले असताना शेतकरीराजा पावसाळी शेती हंगामात कार्यमग्न झाला आहे.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …