Breaking News

‘यंग इंडिया’ची उपांत्य फेरीत धडक

ऑस्ट्रेलियाचे पॅकअप

पोचेफस्ट्रम : वृत्तसंस्था
अथर्व अंकोलेकर याने चिवट झुंज देत फटकावलेले अर्धशतक आणि यशस्वी जैस्वालने साकारलेली अर्धशतकी खेळी यामुळे गतविजेत्या भारताने ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी हरवत 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
अंकोलेकर आणि यशस्वी यांच्या अर्धशतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 बाद 233 धावा उभारल्या. हे आव्हान पार करताना कार्तिक त्यागीच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 159 धावांत गुंडाळला.
यशस्वीच्या 62 धावांनंतरही भारताची स्थिती 6 बाद 144 अशी स्थिती असताना रवी बिश्नोई आणि अथर्व यांनी सहाव्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी रचून भारताला दोनशे धावांचा पल्ला ओलांडून दिला. त्यानंतर अथर्वने अखेरपर्यंत किल्ला लढवत 54 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद 55 धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या सॅम फॅनिंग याने 75 धावा फटकावत कडवा प्रतिकार केला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply