Breaking News

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटीश कौन्सिलचा अत्यंत प्रतिष्ठेचा इंटरनॅशनल डायमेन्शन पुरस्कार मिळाल्याबद्दल पनवेल तालुका संघर्ष समितीने संस्थेचे चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक देवाण-घेवाण वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने ब्रिटिश कौन्सिल अनेक निकषांवर पुरस्कार देत असते. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती व तिचा गोडवा यांचे अत्युत्तम सादरीकरण केले होते. त्याबद्दल या स्कूलला इंटरनॅशनल डायमेन्शन्स हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पुरस्कार पटकावल्यामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. याबद्दल पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समितीच्या तमाम सदस्यांचे आभार मानले तसेच वेळोवेळी तुमचे सहकार्य राहिले आहे ते भविष्यातदेखील असेच राहू द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.  या वेळी समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस विशाल सावंत, उपाध्यक्ष प्रवीण मोहोकर, मंदार दोंदे, विवेक पाटील, संजय कदम, सुनील कटेकर, संतोष सुतार आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply