पंढरपूर : प्रतिनिधी
राज्यातील मंदिरे खुली करावी या मागणीसाठी भाजपपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (दि. 31) प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे आंदोलन करण्यात आले.
प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. आठ दिवसांत नियमावली तयार करून मंदिरे खुली केली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले तसेच या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. आश्वासन पूर्ण झाले नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊन आंदोलन करू, असा इशारा त्यांनी या वेळी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला दिला. 85 टक्के लोक बरे झाले आहेत तर मग घाबरायचे कशाला, अशी विचारणा करताना पुन्हा या प्रश्नावर लढायला आम्हाला लावू नका, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यातील मंदिरे, देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीचे लक्ष वेधण्यासाठी याआधी भाजपच्या वतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …