नवी मुंबई ः बातमीदार नेरुळ येथील क्रिएटिव्ह या तरुणांच्या संस्थेने गरिबांना कपडेवाटप करून शिवजयंती साजरी केली. संपूर्ण महाराष्ट्रात दणक्यात शिवजयंती साजरी केली जात असताना या संस्थेचे अध्यक्ष संदीप निकम यांनी कपडे वाटपाची कल्पना मांडली. सध्या भयंकर उकाडा असून उन्हामुळे अंगाची लाही लाही होते. नेरुळ जिमखान्यासमोर असलेल्या धड झोपडीचे छप्परही नसताना येथील लहान मुले, काही महिला व पुरुष अंगावर फाटके कपडे नेसलेले या तरुणांना पाहायला मिळत होते. या वंचितांसाठी काहीतरी करायची संस्थेच्या तरुणांत इच्छा होती. जुने मात्र न फाटलेले कपडे गोळा करून ते या महिला, पुरुष व लहान मुला-मुलींना वाटण्यात आले. त्यामुळे शिवजयंतीला कोणताही उत्सव साजरा न करता कपडेवाटप करून या तरुणांनी कमी वयातच सामाजिक भान जपले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील गरूड, साईकिरण गरूड, किरण गोंदके, शिवम कांबळे, किशोर वाघमारे, प्रियेश सावंत, बाबू खाडे व अनेक तरुण पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …