Breaking News

रसेलचा चक्क हॉटेलमध्ये सराव

कोलकाता : वृत्तसंस्था

आयपीएलच्या 12व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या प्रेक्षकांसमोर विजय खेचून आणला. 19 चेंडूंत नाबाद 49 धावांची खेळी करणारा आंद्रे रसेल केकेआरच्या विजयाचा नायक ठरला. त्याच्या फटकेबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला आणि डेव्हिड वॉर्नरच्या झोकात पुनरागमनावर पाणी फिरवले गेले. सामन्यानंतर रसेलने गतिमंद चाहत्याची भेट घेऊन सर्वांची मने जिंकली, पण त्याच रसेलने मंगळवारी (दि. 26) नियमांचे उल्लंघन केले.

कोलकाताचा दुसरा सामना किंग्स इलेव्हन पंजाबशी होणार आहे. घरच्या मैदानावर बुधवारी (दि. 25) होणार्‍या या सामन्यासाठी कोलकाताचा संघ सज्ज आहे आणि रसेल पुन्हा चौकार-षटकाराची आतषबाजी करण्यासाठी आतुर आहे. त्यासाठी तो चक्क राहत असलेल्या हॉटेलचे नियम मोडून सराव करत आहे. रसेलने मंगळवारी हॉटेलच्या लॉबीतच गोलंदाजीचा सराव केला आणि कोलकाता संघाने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply