Breaking News

साळाव ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू आणि मास्कवाटप

रेवदंडा ः प्रतिनिधी

कोरोना संसर्गाच्या संकटकाळात शासनाने लॉकडाऊन जारी केल्याने रोजदांरीवर काम करीत असलेल्या ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत साळाव ग्रामपंचायत सरपंच नीलम पाटील, उपसरपंच दिनेश बापळेकर, ग्रा. पं. सदस्य व ग्रामसेवक जितेंद्र म्हात्रे यांनी सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमातून साळाव ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू व मास्कचे वाटप करण्यात आले.   

साळाव ग्रामपंचायत हद्दीत सोशल डिस्टन्सिंग ठेवत सरपंच नीलम पाटील, उपसरपंच दिनेश बापळेकर, ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील, वैभव कांबळी, राजू वाघमारे, हेमा साळावकर, योगिता शेट्टी, दीपिका पाटील, तनुजा बापलेकर, मंजुळा वाघमारे तसेच ग्रामसेवक जितेंद्र म्हात्रे, कर्मचारी विजय नागोठणेकर, गणेश नागोठणेकर, माधुरी  कांबळी यांनी गावातील घराघरांत जाऊन अत्यावश्यक वस्तू व मास्कचे वाटप केले. साळाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात कोरोनाविषयक जनजागृती, सोशल डिस्टन्सिंगसाठी आग्रह, रोगप्रतिबंधक फवारणी, मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतून आलेल्या व्यक्तींची नोंद ठेवणे, आदिवासी ग्रामस्थांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप आदी सामाजिक बांधिलकीची कामे करण्यात आली आहेत.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply