Breaking News

न्हावे येथील पाण्याची समस्या मार्गी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वर्खातून टाकीची उभारणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील न्हावे येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाण्याची समस्या उद्भवू नये याकरीता स्वःखर्चातून पाण्याची टाकी उभारण्याकरीता आर्थिक मदत केली आहे. त्यानुसार या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 9) भूमिमपूजन झाले.
रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून न्हावे येथे ग्रामस्थांच्या सोई करीता जलकुंड अर्थात पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर 30 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर गुरुवारी या पाण्याच्या टाकीचा भुमीपूजन सोहळा आयोजीत करण्यात आला असून या कामाचे मान्यवरांच्याहस्ते भुमीपूजन करण्यात आले. या पाण्याच्या टाकसाठी नंदकिशोर भोईर आणि नितीन भोईर यांनी जागा दिली आहे. या भुमीपूजनावेळी भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच मंजुषा ठाकूर,सदस्य सागरशेठ ठाकूर, देवेंद्र भोईर, अमृता पाटील, कल्पना घरत, निर्मला ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, जयवंत देशमुख,सुधिर ठाकूर, किशोर पाटील, माजी उपसरपंच साधना तांडेल, आशिष पाटील, रवींद्र पाटील, उत्तम म्हात्रे, गाव अध्यक्ष शैेलेश पाटील, महिला मंडळ अध्यक्षा मिनाक्षी पाटील, संजय ठाकूर, सी.एल.ठाकूर, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, किसन पाटील, नितीन भोईर, नंदकिशोर भोईर, रंजना घरत, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी अरुणशेठ भगत यांनी सांगीतले की, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रुपाने सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यसाठी सर्वतोपरी मदत कराणार नेता आपलयाला मिळाला आहे, असे प्रतिपादन केले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply