Breaking News

अरुण घाग यांची निवड

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई या विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण घाग यांची 2021 ते 2023 या कालावधीसाठी संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी कार्यकारी मंडळ सदस्य आणि रयत सेवक कुटुंब कल्याण योजनेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती झाली आहे.

अरुण घाग यांचे या निवडीबद्दल स्थानिक स्कूल कमिटीच्या वतीने कामगार नेते सुरेश पाटील यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, जी. आर. पाटील, शाळेचे चेअरमन अरुण जगे, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख, शिक्षक वृंद, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, विद्यार्थी व पालक वर्गाने अभिनंदन केले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply