Breaking News

आयओटी कंपनीकडून समाजोपयोगी उपक्रम

उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून उरण तालुक्यातील धुतुम येथील इंडियन ऑइल टँकिंग (आयओटी) या कंपनीने, उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या आपत्ती व्यवस्थापनास मदतीसाठी एक अ‍ॅम्ब्युलन्स भाडेतत्त्वावर घेऊन ती दोन महिन्यासाठी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना कोविड उपयोगासाठी दिली आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा

देऊ केली आहे.इंडियन ऑइल टँकिंग (आयओटी) या कंपनीने या आधी धूतूम, रांजणपाडा, सुरूंग पाडा, उरण येथे जीवनावश्यक वस्तू, धान्य वाटप केले. तसेच जसखार आणि धूतूम येथे मास्क व हॅण्डवॉशचे वाटप करुन समाजातील गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या सीएसआर फंडातून धुतुम गावासाठी 14 लाखांची ओपन व्यायाम शाळा लोकार्पण केली आहे. कंपनीने समाजपयोगी केलेल्या स्तुत्य उपक्रम केल्याबदल उरण तालुक्यातून सर्व नागरिक आभार व्यक्त करीत आहेत.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply