वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2021/05/6C2A4800-1024x683.jpg)
पनवेल ः महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आई शकुंतला ठाकूर, भाऊ भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त परेश ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत महापौर सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, समीर ठाकूर, हरेश केणी, बबन मुकादम, अमर पाटील, भाजप जिल्हा सदस्य उमेश इनामदार उपस्थित होते.
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2021/05/6C2A4851-1024x683.jpg)
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2021/05/6C2A4829-1024x683.jpg)