Breaking News

टाचदुखीपासून मिळवा मुक्ती

आरोग्य प्रहर

आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सूज येणे अशा अनेक समस्या उद्भवतात, तर कधी खूप वेळ उभे राहिल्याने, अधिक वजन असल्यास किंवा आपण जर चुकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखू लागतात, मात्र हे दुखणे अतिशय असह्य होते.

काही घरगुती उपयांनी आपण टाचांच्या दुखण्यापासून कायमची मुक्ती मिळवू शकतो. टाचा खूपच दुखत असल्यास बर्फाने शेकवा. त्याने लाभ होईल. बर्फाच्या थंडाव्यामुळे पेशीत निर्माण झालेला ताण आणि त्रास कमी होण्यास मदत होते. परिणामी दुखणार्‍या टाचांपासून आपल्याला आराम मिळतो. त्यासाठी 15 मिनिटे बर्फाने शेकवा.आपले टाचांचे दुखणे कमी करण्यासाठी तेलाची मालिश हा एक उत्तम उपाय आहे. या उपायाने दुखण्यावर लगेचच आराम मिळतो. मसाज केल्याने मसल्स रिलॉक्स होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यासाठी खोबरेल तेल, मोहरीचे तेल इत्यादीने टाचांना मसाज करा.

दिवसातून तीन वेळा 10-10 मिनिटे मसाज केल्याने दुखण्यावर आराम मिळतो आणि सूजही कमी होते. तसेच या उपायाने इतरही अनेक लाभ होतात.हळदी औषधी आणि बहुगुणी असते. हळदीतील कर्क्युमिन तत्त्वामुळे दुखणे, सूज यापासून आराम मिळतो. त्यासाठी एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद घालून पाच मिनिटे मंद आचेवर गरम करा. नंतर दुधात एक चमचा मध घाला आणि प्या. टाचांचेच नाही तर शरीरातील इतर भागातील दुखण्यांपासून आराम देण्यासही मदत होते.

तळवे, टाचांचे दुखणे दूर करण्यासाठी मिठाचे पाणीही उपयुक्त ठरते. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे जाडे मीठ घाला. ते नसल्यास बारीक मीठ वापरले तरी चालेल. त्यानंतर त्या पाण्यात 15-20 मिनिटे पाय बुडवून ठेवा. आपल्याला दुखण्यापासून त्वरित आराम मिळेल. त्यानंतर साध्या पाण्याने पाय धुवा.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply