Breaking News

दहावी, बारावी परीक्षेसाठी कोरोनापूर्व नियमावली

दोन महत्त्वाचे निर्णय रद्द

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदाच्या दहावी, बारावी परीक्षांमधील दोन नियम बदलण्यात आले आहेत. यंदाच्या परीक्षा कोरोनापूर्व काळाप्रमाणे घेण्यात येणार आहेत.
यंदाच्या एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. याचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांना यंदापासून त्यांच्या शाळेतच त्यांचे परीक्षा केंद्र मिळणार नाही तसेच कोरोना काळात जो 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जात होता तोदेखील रद्द करण्यात आला आहे.
कोरोना महामारीवेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या होम सेंटर्सची म्हणजेच ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षेची सुविधा आणि 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ सुरू करण्यात आला. आता कोरोनाचा फार मोठा धोका नसल्यामुळे आम्ही जुने नियम परत आणत आहोत, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा 2 मार्चला सुरू होणार आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply