पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयातील राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) विभाग सिनियर अंडर ऑफिसर मृण्मयी राजेंद्र धाडगे आणि अनुज धरमसिंह रणवा यांची दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली होती.
या वर्षी 17 राज्यांमधून महाराष्ट्र राज्याला सर्वश्रेष्ठ विजेता म्हणून प्रधानमंत्री ट्रॉफी हे प्रथम पारितोषिक देण्यात आले.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सध्या सुरू असलेला साथीचा आजार या परिस्थितीमध्ये सर्व सामाजिक अंतराचे नियम लादण्यात आलेले असताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत ते या परिस्थितीतून पुढे आले.
सहा महिन्यांच्या अथक परिश्रमाचे सार्थक करून 26 जानेवारी रोजी झालेले राजपथवरील संचलन आणि 28 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम रॅली पूर्ण करून दोन्ही कॅडेट 30 जानेवारी रोजी महाराष्ट्रात परतले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. के. पाटील आणि एनसीसीचे कॅप्टन डॉ. यू. टी. भंडारे , सीटीओ नीलिमा तिदार यांनी त्यांचे कौतुक केले.