
माणगाव ः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे 14 ते 20 सप्टेंबर या सेवा सप्ताहादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत माणगावात बुधवारी (दि. 16) उपजिल्हा रुग्णालय व क्रिटीकेअर हॉस्पिटल येथील रुग्णांना भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे व महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांच्या हस्ते व सहकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फळवाटप करण्यात आले.
तसेच माणगाव भाजपतर्फे गुरुवारी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिली. बुधवारी माणगाव तालुका भाजपतर्फे रुग्णांना करण्यात आलेल्या फळवाटप कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. शांतीनाथ डोईफोडे, भाजपचे तालुका सरचिटणीस उमेश साटम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल गलांडे, बाबूराव चव्हाण, महिला मोर्चा कार्यकर्त्या अश्विनी महाडिक, शीला सोनार, संजय सावंत, संतोष कदम, संजय जाधव आदी उपस्थित होते.