उरण : वार्ताहर : उन्हाचा पारा चढू लागताच सर्वांना आठवण येते ती थंडगार माठातील पाण्याची ,मातीच्या पाण्याची चव हि काही वेगळीच असे माठ विक्रेते उरण शहरात ठिक -ठिकाणी दुकाने थाटून बसलेले सर्वत्र दिसत आहेत .असे माठ आनंदी हॉटेल जवळ ,उरण चारफाटा ,शेवा -चारफाटा ,व काही विक्रेते हातगाडी वर तर काही विक्रेते डोक्यावर माठ विकतांना दिसत आहेत .
मातीच्या माठातील पाणी आरोग्याला लाभदायक व कोणतेही विजेचे बिल न येणारे गरीबांचा फ्रीज म्हणून हि बोलले जाते .त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील नागरिक मातीचे माठ खरेदी करणे पसंत करतात .परंतु अलीकडच्या काळात गुजरात ,राजस्थान माठ वाल्यांनी बाजारात हळू हळू आपले वास्तव्य बसविण्यात सुरुवात केल्याने स्थानिक कुंभार व्यवसाय हि अडचणीत आला आहे ..त्यातच स्थानिक व्यावसायिकांना सध्या माठ बनविण्यासाठी लागणारी माती हि आणण्यासाठी प्रचंड महाग झाल्याने फारच कसरत करावी करावी लागत आहे .त्या मुळे स्थानिक कुंभार व्यासायला उतरतीकळा लागली आहे .अशी खंत एका कुभाराने व्यक्त केली आहे .
उन्हाळी हंगामात दरवर्षी राजस्थानी माठ व्यावसायिक संपूर्ण राज्यभरात ठिक -ठिकाणी आपले बस्तान मांडतात या शिवाय मोक्याच्या जागा बघून आपला व्यवसाय थाटतात .त्यांना बर्या पैकी नफा हि मिळत असल्याने दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात माठ विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
उन्हाळ्यात दरवर्षी आम्ही गुजरात, अहमदाबाद येथून मातीचे माठ विक्रीस आणतो. या माठाचे वैशिष्ट्य असे की वाळू व मातीमिश्रित असे हे मातीचे माठ असतात.
त्यामुळे पाणी थंडगार राहण्यास मदत होते.
माठाचा आकार व कलाकुसर यावर किंमत असते. 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत माठांची किंमत असते. आता मातीचे रंगीत व आकर्षक माठ नागरिक पसंत करीत आहेत.
-सुमनकुमार शाह,माठ विक्रेते