Breaking News

काबूलमध्ये दहशतवादी हल्ला

काबूल ः वृत्तसंस्था : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. येथील पीडी 13मध्ये अब्दुल अली मजारी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील पीडी 13 येथे अब्दुल अली मजारी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अफगाणिस्तामध्ये माजी राष्ट्रपती हामिद करजई यांच्या समवेत अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते. मीडियाच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रपतिपदाचे उमेदवार अब्दुल लतीफ पेड्रम जखमी झाले आहेत. यासोबतच माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रपतिपदाचे उमेदवार हनीफ अत्तार यांचे आठ बॉडीगार्डसुद्धा जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले असून परिसर खाली करण्यात येत आहे. याशिवाय जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, तसेच या हल्ल्यात जवळपास तिघांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply