Breaking News

उरण-पनवशेलमधील विद्यार्थ्यांचे गोशीन कराटे स्पर्धेत सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त : पनवेल येथे नुकत्याच गोशीन रियू साऊथ वेस्ट झोन कराटे स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धांमध्ये उरण व पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

विविध वयोगटातील विजेते स्पर्धेक पुढीलप्रमाणे ः अमिता घरत, सिद्धी माळी (प्रथम), अमिशा घरत (द्वितीय), दिक्षिता पाटील (प्रथम), सेजल पाटील (द्वितीय), ऋतुराज माळी (प्रथम), अमर घरत (प्रथम), भाविक पाटील (प्रथम), मन शिवकर (तृतीय), सई ठाकूर (प्रथम), कक्षा म्हात्रे (प्रथम), तन्वी म्हात्रे (द्वितीय), श्रेया म्हात्रे (द्वितीय), तामन्ना गावंड (द्वितीय), सृष्टी ठाकूर (तृतीय), गायत्री म्हात्रे (प्रथम), विनया पाटील (प्रथम), केतन ठाकूर (द्वितीय), अभिषेक यादव (द्वितीय), शुभम ठाकूर (प्रथम), अनिष पाटील (प्रथम), आदित्य ठाकूर (प्रथम). या स्पर्धेसाठी केरळ, कर्नाटक, बेळगाव, गुलबर्गा, गुजरात येथून स्पर्धक आले होते, तसेच मलेशिया येथील वसंथन (ज्युनिअर टीम कोच) व सिहान राजू कोली (महाराष्ट्र प्रमुख), आनंद खारकर, कृष्णा पाटील, संतोष मोकल व गोपाळ  म्हात्रे (उरण तालुकाप्रमुख) यांनी सहकार्य केले. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे राजू मुंबईकर सर, नागेंद्र म्हात्रे सर, निवास गावंड, विठ्ठल ममताबादे हे या वेळी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply