Breaking News

अलिबागमध्ये उद्या महारक्तदान शिबिर

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात  कोविड-19च्या  रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रक्तसाठा कमी होत असून, पुढील काही दिवसांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा रुग्णालयाने रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याला प्रतिसाद देत अलिबागमधील विविध सामाजिक संघटनांमार्फत शुक्रवारी (दि. 25) कच्छी भुवन येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अलिबाग येथील कच्छी भुवन ट्रस्ट, लायन्स क्लब, लिओ क्लब, डायमंड क्लब, रोटरी क्लब, रोट्रॅक्ट या सामाजिक सेवा संस्थांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.
सोशल डिस्टन्स पाळून रक्तदान करण्याच्या दृष्टीने संस्थेचे प्रतिनिधी रक्तदात्याला कॉल करून येण्यासाठी ठराविक वेळ देतील. त्या वेळेतच रक्तदान करण्यास यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply