Breaking News

बालग्रामच्या मुलांसाठी भिक्षाफेरीतून मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

रविवारी कोकण कट्टा ह्या विलेपार्ले या समाजसेवी ग्रुपने ग्राम संवर्धन सामजिक संस्थेतील बालग्रामच्या  अनाथ, गरीब, आदिवासी आणि गरजू मुलांसाठी माणुसकीची भिक्षाफेरीतून बाराशे किलो धान्य व दैनंदिन लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे.

कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश मंचेकर, दिलीप पवार, मिलिंद पालेकर कोकण कट्टा आयोजन समितीच्या आकांक्षा पितळे व स्नेहल कदम संस्थेचे कार्यकर्ते सुनील वनकुद्रे जयवंत घावरे, सुभाष कांबळे, सुजित कदम, राहुल वर्तक, दया मांडवकर, रवी कुळे, हर्षल धराधर, दशरथ पांचाळ यांनी रविवारी भिक्षाफेरीतून मिळालेले साहित्य बालग्रामचे प्रकल्प समन्वय उदय गावंड, जन संपर्कप्रमुख राजेश रसाळ यांच्यासह बालग्रामच्या विध्यार्थ्यांकडे सुपूर्द केले.

या वेळी कोकण कट्टाचे सदस्य संतोष कदम आणि दादा गावडे यांनी आपला वाढदिवसही ह्या मुलांसोबत साजरा करत मुलांना त्यांना मिष्टान्न दिले. विशेष म्हणजे पार्लेकर रिक्षाचालक प्रभाकर सांडम यांनी त्यांच्या रिक्षांमध्ये ठेवलेल्या दानपेटीतून मिळालेल्या देणगीतून 25 मुलांना बूट दिल्याने उपस्थित सर्वांनी ह्या तरुणाच्या दातृत्वाचे कौतुक केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply