Breaking News

उरण येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

112 रक्तदात्यांनी केले रक्तदान

उरण : वार्ताहर

उरण तालुका ग्राहक सहकारी संस्था (मर्यादित) द्रोणागिरी बाजारतर्फे रविवारी (दि. 11) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत द्रोणागिरी बाजार, गानू सदन, पोलीस  लाईन समोर, उरण नागाव रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एनएमएमसी रक्तपेढी वाशी (नवी मुंबई) यांच्या सहकार्याने सदर शिबिर झाले.

यंदा रक्तदान शिबिराचे दुसरे वर्ष आहे. 112 रक्तदात्यांनी रक्तदान केले, अशी माहिती उरण तालुका ग्राहक सहकारी संस्था (मर्यादित) द्रोणागिरी बाजार अध्यक्ष महेंद्र म्हात्रे यांनी दिली. या वेळी उरण तालुका ग्राहक सहकारी संस्था (मर्यादित) द्रोणागिरी बाजार अध्यक्ष महेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष भारत घरत, सेक्रेटरी- अशोक तांडेल व संचालक मंडळ यांनी मेहनत घेतली. सर्वांचे सहकार्य मिळाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदानास पात्र असलेल्या रक्तदात्यांनी ह्या आपत्तीवर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व संचारबंदीचे नियम पाळून  रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply