Breaking News

सिडकोच्या घरांची सोडत आता दिवाळीनंतर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सिडकोच्या मागील वर्षीच्या पंधरा हजार घरांच्या सोडतीत घर न मिळालेल्या हजारो ग्राहकांपैकी तीस हजार ग्राहकांच्या प्रतीक्षा यादीतील पाच हजार ग्राहकांना नवीन नऊ हजार महागृहनिर्मितीच्या सोडतीत संधी दिली जाणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना परिवहन आधारित गृहसंकुलातील घरांची लॉटरी लागणार आहे. आचारसंहिता असल्यामुळे नवीन महागृहनिर्मितीतील घरांची सोडत आता दिवाळीनंतरच होणार आहे. सिडकोने 9 हजार 249 घरांची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. याच घरांबरोबर जुन्या स्वप्नपूर्तीतील तयार घरांची सोडत देखील काढणार आहे. या दोन्ही सोडतीसाठी एकूण 54 हजार अर्ज आले आहेत. यात नवीन 9 हजार घरांसाठी सोळा हजार ग्राहकांनी अनामत रक्कम भरून आरक्षण केले आहे, तर स्वप्नपूर्तीतील 813 तयार घरांसाठी अडीच हजार अर्ज दाखल झालेले आहेत. या दोन्ही संकुलांतील घरांची पुढील महिन्यात दिवाळीपूर्वी सोडत काढली जाणार होती. सुमारे दहा हजार ग्राहकांना घरांची भेट देऊन सिडको त्यांची दिवाळी साजरी करणार होती, मात्र आचारसंहिता व निवडणुका संपल्यानंतर लागलीच दिवाळी सुरू होत असल्याने ही सोडत आता दिवाळीनंतर होणार आहे. या दहा हजार घरांसाठी एकूण दोन लाख अर्ज येण्याची  शक्यता आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply