Breaking News

म्हसळ्यात निवडणूक विभागाचे प्रशिक्षण

म्हसळा : प्रतिनिधी

निवडणूक विभागाच्या मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करून योग्य नियोजन व आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांनी म्हसळा येथे केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसळ्यातील अंजुमन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये निवडणूक कर्मचार्‍यांसाठी  आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात प्रविण पवार उपस्थितांना मार्गदर्शन करीत होेते.

या वेळी मतदान केंद्राध्यक्ष (झज) , प्रथम मतदान अधिकारी (ऋझज) व इतर मतदान अधिकारी  (0झज) अशा सुमारे 400 कर्मचार्‍यांना 10 झोनल ऑफीसर, 10 सहाय्यक झोनल ऑफीसर व मास्टर ट्रेनरच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमात एतच् -ततझ-ढ ची परिपूर्ण माहीती, मतदान यंत्र हाताळणे, जोडणी याबाबतचे प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रिये दरम्यानच्या विविध फॉर्मचे नमुने भरण्याबाबत माहीती देण्यात आली.

या वेळी तहसीलदार शरद गोसावी, नायब तहसीलदार के. टी. भिंगारे, निवडणूक  निवडणूक नायब तहसीलदार नामदेव मोरे व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply