Breaking News

घोटाळेबाज संचालकाच्या मालमत्तांचे बेकायदेशीर हस्तांतरण थांबवा

संघर्ष समितीची मागणी, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पेण : प्रतिनिधी

पेण अर्बंन बँक घोटाळा प्रकरणातील घोटाळेबाज संचालक पदाधिकार्‍यांच्या मालमत्तांचे बेकायदेशीर हस्तांतरण थांबविले जावे, अशी मागणी  ठेवीदार खातेदार संघर्ष समितीने जिल्हाधिकारी, तपास अधिकारी, पेण पोलीस, प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संघर्ष समितीने सादर केल्येल्या निवेदनात म्हटले आहेत की, पेण अर्बंन बँकेच्या 758 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने वसुली करण्याचे आदेश कृती समितीला दिले आहेत. तसेच बँकेचे संचालक, पदाधिकार्‍यांच्या (घोटाळेबाज) मालमत्तेवर टाच आणली आहे. तरीही घोटाळेबाज संचालक पदाधिकार्‍यांच्या जमिनी, दुकानांचे गाळे, बिल्डींग यांचे हस्तांतरण व गैरव्यवहार सुरु आहेत. पेण अर्बन बँकेच्या महाघोटाळ्यातील आरोपीत अध्यक्ष व संचालक यांच्या जप्त, अधिसुचीत झालेल्या मालमत्तांमध्ये बनावट कुळांच्या नावे होणारे फेरफार तसेच अन्य जमिनी-मालमत्तांमध्ये गैरमार्गाने व बेकायदेशीर हस्तांतराबद्दल ‘विशेष कृती समितीच्या’ मासिक बैठकीमध्ये अनेकवेळा तक्रारीही केल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशांची अवमानता व उल्लंघन होत आहे. व ठेवीदारांच्या हितास बाधा येऊन न्याय मिळण्यात अडथळा आणला जात आहे, या निवेदनात म्हटले आहे.

बँक ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी वरील प्रकारच्या गैरव्यवहारास तातडीने प्रतिबंध करावा, आळा घालावा व संबंधित दोषींवर आवश्यक कारवाई करून त्यांना दंडीत करावे, अशा प्रकारचे निवेदन संघर्ष समितीचे कार्यध्यक्ष नरेन जाधव यांनी पेण प्रांत अधिकार्‍यांना दिले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply