Breaking News

डीव्हिलियर्सच्या खेळीने बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

दुबई : तडाखेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीच्या जोरावर शनिवारी (दि. 17) राजस्थानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात बंगळुरूने सात गडी आणि दोन चेंडू राखून धमाकेदार विजय मिळविला. राजस्थानच्या संघाने 20 षटकांत 177 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना 18व्या षटकापर्यंत बंगळुरूचा संघ मागे राहिला होता, पण डीव्हिलियर्सच्या जबरदस्त फटकेबाजीच्या बळावर शेवटच्या दोन षटकांत 35 धावा करीत बंगळुरूने ‘रॉयल’ विजय मिळवला. बंगळुरूचा हा यंदाच्या आयपीएलमधील सहावा विजय ठरला आहे.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply