पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, शनिवारी (दि. 17) नव्या 227 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 341 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 133 व ग्रामीण 42) तालुक्यातील 175, अलिबाग 15, खालापूर 12, रोहा आठ, उरण व पेण प्रत्येकी सहा, महाड दोन आणि कर्जत, माणगाव व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात तीन आणि उरण तालुक्यातील दोन असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 51,873 आणि मृतांची संख्या 1467 झाली आहे. जिल्ह्यात 47,979 जण कोरोनामुक्त झाल्याने 2427 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper