पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आदेशानुसार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.
भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड सरचिटणीसपदी दिनेश खानावकर, अभिषेक भोपी; उपाध्यक्षपदी अॅड. चिन्मय समेळ, निलेश भगत, जगदिश आगिवले, अॅड. शिवानी घरत, गौरव कांडपिळे, अजय मोरे; सचिवपदी विवेक होन, परेश पाटील, शुभ पाटील, हेमंत भाटिया, नितेश घुगे, कोषाध्यक्षपदी मिनेश मसणे; कार्यकारिणी सदस्य म्हणून फुलाजी ठाकूर, रवींद्र अभिमने, डॉ. सुमित मिश्रा, प्रज्योत कल्याणकर, करण सोनावणे, प्रणय मोरे, भूषण जळे, शशिकांत इंगळे, सुरज परदेशी, शिवगोपाल तोमर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी विभाग संयोजकपदी आशिष कडू, युवा वॉरियर्स संयोजक देवांशू प्रभाळे, युवती प्रमुख संयोजक रवीना आर्य, आत्मनिर्भर भारत अभियान संयोजक अक्षय पाटील, सोशल मीडिया संयोजक हेन्री जोस आणि मन की बात, सरल अॅप, नमो अॅप, नमो राजदूत संयोजक म्हणून ऋषिकेश साबळे यांची नियुक्ती झाली आहे.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …