Breaking News

कर्मचार्‍यांसाठी गुड न्यूज!; अनेक कंपन्यांकडून पगारकपात मागे

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये कपात केली होती, मात्र आता सर्वकाही रूळावर येत असल्याने यापैकी बहुतेक कंपन्यांनी पगार कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे काही कंपन्या कर्मचार्‍यांच्या पगारवाढीचा विचारही करीत आहेत, तर काही कंपन्या कर्मचार्‍यांना बोनस देण्याचाही विचार करीत आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये काही विभागांनी कर्मचार्‍यांचे कमी केले पगार पूर्ववत केले आहेत. त्याचबरोबर कोविड लॉकडाऊनच्या काळात चांगले काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कंपनीकडून परफॉर्मन्स बोनसही देण्यात येणार आहे. बिझनेस स्टॅण्डर्डच्या वृत्तानुसार, गेल्या तीन आठवड्यांपासून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि माइण्डट्री यांसारख्या अनेक टॉपच्या आयटी कंपन्यांनी नवी पगारवाढ जाहीर केली आहे तसेच सणांच्या काळात बोनसही देणार असल्याचे म्हटले आहे.

पगारवाढ आणि बोनसही मिळणार

काही कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची पगारवाढ आणि बोनसचाही विचार करीत आहेत. फार्मा, कन्झुमर फूड आणि टेक्नॉलॉजीसारख्या ज्या क्षेत्रांनी कोरोनाच्या काळात चांगली कामगिरी केली  त्या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना परफॉर्मन्स बोनस देण्याच्या विचारात आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply