Breaking News

वाचनालयाशी भावनिक नाते -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेलच्या लिमये सार्वजनिक वाचनालयास दोन लाखांची मदत
70व्या वाढदिवसानिमित्त 70 पुस्तकांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त
के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय हे नवोदित तसेच होतकरू साहित्यिक, कवी, लेखक यांना नेहमीच प्रोत्साहित करीत आहे. या वाचनालयाचा अधिक उत्कर्ष व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.
पनवेलच्या साहित्यिकांच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त येथील साहित्यिकांची 70 पुस्तके लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते के. गो. लिमये वाचनालयाला भेट देण्यात आली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वाचनालयाशी आपले भावनिक नाते असल्याचे स्पष्ट करीत येथून आणखी साहित्यिक, लेखक, कवी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला, तसेच वाचकांसाठी हे वाचनालय एक आदर्श साहित्य वास्तू असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध गझलकार ए. के. शेख, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, साहित्यिक प्रा. चंद्रकांत मढवी, ज्योत्स्ना राजपूत, गणेश म्हात्रे, रामदास गायधने, नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य श्याम पुंडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या सहचिटणीस जयश्री शेट्येे, ग्रंथपाल निकिता शिंदे, पत्रकार रमेश भोळे, सुमंत नलावडे, लक्ष्मण ठाकूर आदी उपस्थित होते.
या वेळी सुप्रसिद्ध गझलकार ए. के. शेख यांनी म्हटले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 70वा वाढदिवस साजरा होत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमीच साहित्यिक, कवी, लेखकांना प्रोत्साहन देत असतात. साहित्यिकांबद्दल त्यांना आस्था असून, या नगरीचे ते पालक आहेत.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कवी, लेखक, साहित्यिक आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जवळचे नाते आहे. साहित्यिक वारसा पुढे चालत राहावा यासाठी वाचनालयीन पुस्तके भेट देत आहोत, असे सांगून हा साहित्यिकांसाठी आगळावेगळा उपक्रम असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या दोन लाख रुपयांच्या मदतीबद्दल के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या सहचिटणीस जयश्री शेट्ये, ग्रंथपाल निकिता शिंदे यांनी वाचनालयाच्या वतीने आभार व्यक्त केले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply