Breaking News

मुख्यमंत्री न्याय देत नाहीत म्हणून सगळे राज्यपालांकडे जातात; भाजपचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी

मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कामे केली तर नेत्यांना आणि सामान्यांना राज्यपालांची भेट घेण्याची गरज नाही, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना व ठाकरे सरकारला लगावला आहे. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यावर भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे. ’आपण म्हणजे महाराष्ट्र या भ्रमातून बाहेर येण्याची गरज आहे’, असे शरसंधान त्यांनी साधले आहे. विरोधी पक्षनेते दरेकर पुढे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे. राज्यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर राज्य सरकारकडे मिळत नाही. म्हणून सगळे राज्यपालांना भेटत आहे. राज ठाकरे हेसुद्धा याच भावनेतून राज्यपालांना भेटले. याआधीही महाराष्ट्रातील नेते राज्यपालांना भेटले आहेत. नेते राज्यपालांकडे का जातात याचे आत्मपरिक्षण करावे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

सरकारमध्ये कुरबरी

काँग्रेस नेते व मंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानावरून सत्ताधारी महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे दिसते. पक्षीय चढाओढ असताना महाराष्ट्राची जनता व विकासाकडे मात्र यांचे दुर्लक्ष होत आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply