Breaking News

कोल्हारे ग्रामपंचायतीच्या धूर फवारणी यंंंत्राचे लोकार्पण

कर्जत ः बातमीदार

कोरोनावर मात करण्यासाठी कर्जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती विविध साधनांचा वापर करून परिसर निर्जंतुक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या अनुषंगाने कोल्हारे ग्रामपंचायतीने स्वतःचे धूर फवारणी मशिन खरेदी केले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या आवाहनानंतर तेथील भक्ती रेसिडेन्सीमधील तरुणांनी ग्रामपंचायत आरोग्य कर्मचार्‍यांना आरोग्य साहित्याची मदत केली. कोल्हारे ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या धूर फवारणी यंत्राचे लोकार्पण ग्रामपंचायत सरपंच शेवंता वळवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या वेळी उपसरपंच रामदास हजारे, माजी उपसरपंच राजेंद्र विरले, जयवंत हजारे, ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर आदींसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य विलास हजारे तसेच विजय हजारे आदींनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या मदतीने कोल्हारे गावातील सर्व भागात धूर फवारणी करून घेतली.त्यानंतर कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना येथील भक्ती रेसिडेन्सी तरुण मंडळ यांच्या माध्यमातून आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. भक्ती रेसिडेन्सीचे सेक्रेटरी उदय पवार, सतीश जाधव, कुंडलिक सोळसे, किरण ढेंगळे, अजय केसरवणी, दिनेश कांबळे, उदय ठक्कर, अशोक गायकवाड आदींनी सामजिक बांधिलकी जपत काम केले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply