Breaking News

मनसेकडून ‘तो’ फोटो ट्विट करून राऊतांवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी

महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना व त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे. राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेवर मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची घेतलेल्या भेटीचा फोटा ट्विट केला आहे. या फोटोसोबत ’महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ असे म्हणत राऊतांवर निशाणा साधला आहे. राज्यातील जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेत राज्य सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. पुण्यातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी राज ठाकरेंनी राज्यपालांच्या घेतलेल्या भेटीवरही राऊत यांनी टीका केली होती. त्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांचा जुना फोटो ट्विट करून त्यांना चपराक दिली आहे.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply